आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने नाटय स्पर्धा उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने नाटय स्पर्धा उत्साहात साजरा

गडचिरोली, दि.25: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने एचआयव्ही-एड्स जनजागृतीकरीता गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली रेड रिबिन क्लब स्थापित महाविद्यालयामधील विद्यार्थी करीता नाटय स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये 1) महाराष्ट्र ग्रुप-केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी 2) सोशल वर्क ग्रुप- फुले आंबेडकर सोशल वर्क महाविद्यालय, गडचिरोली 3)  एमजी-वारीयर ग्रुप – महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी 4) शिवाजी महाराज ग्रुप- केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी 5) संकल्प ग्रुप- शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली असे पाच ग्रुप सहभागी झालेले होते.
या स्पर्धेमध्ये 1) प्रथम विजेता- शिवाजी महाराज ग्रुप- केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी 2) द्वितीय विजेता- महाराष्ट्र ग्रुप-केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी, 3) तृतीय विजेता- सोशल वर्क ग्रुप- फुले आंबेडकर सोशल वर्क महाविद्यालय, गडचिरोली विजेता झालेली आहे. विजेत्यास बक्षिस रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य उदिष्टे म्हणजे नाटयद्वारे एचआयव्ही-एड्सची जनजागृती तसेच टोल फ्री क्रमांक 1097 बाबत माहिती असा संदेश युवा पिढीच्या सहाय्याने समाजापर्यंत पोहचविणे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शासकीय विज्ञान महाविद्यालय प्राचार्य श्री. झाकी, महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO) एस.यु. पाटील, श्री. अष्टपुत्रे, डॉ. अब्दुल चौधरी, राजेश गोंडाने समुपदेशक, हनुमंत नेलगे (M&E) उपस्थित होते. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.