शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील साहित्याचा लिलाव

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील साहित्याचा लिलाव

गडचिरोली, दि.24 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी जि. गडचिरोली येथील विविध व्यवसायातील निरूपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे, स्क्रॅप इ. साहित्याची विक्री करण्यात येत आहे. या करिता २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

इच्छूक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी जि. गडचिरोली यथे अधिकृत लेख्यासह मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील प्राचार्य आर. एम. डांगे यांनी कळविले आहे.