प्रकल्प कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व आदिवासी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

प्रकल्प कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व आदिवासी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना विविध योजनांचे होणार वाटप

चंद्रपूर, दि.21: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा व तदनंतर आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे पात्र लाभार्थ्यांना वाटप मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.23 फेब्रुवारी रोजी सायकांळी 5 वाजता नियोजन भवन सभागृह येथे सदर मेळावा कार्यक्रम पार पडणार आहे.

तसेच दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देवाडा (ता. राजुरा) येथे आदिवासी लाभार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.