बेरोजगार महिलांसाठी रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण

बेरोजगार महिलांसाठी रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण

भंडारा, दि. 14 : जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आकांशा या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत अॅडव्हान्स इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील पात्र युवती व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे 18 महिने कालावधीचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणादरम्यान संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्त्व विकासावर भर देण्यात येणार असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण महिलांसाठी मोफत असून निवासी स्वरुपाचे असणार आहे. प्रशिक्षणाकरीता लाभार्थ्यांचे वय 17 ते 28 वर्षे असावे, किमान कोणत्याही शाखेतील 12 वी पास किंवा आयटीआय पास असणे आवश्यक आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांचे पालक शासकीय नोकरीत नसावे. प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी सुरु असून प्रशिक्षण प्रवेशाकरिता 30 जुलैपर्यंत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 7 ऑगस्टला ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा 07184-252250 येथे संपर्क साधावा.