जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

 

भंडारा, दि. 13: जिल्ह्यातील पाचगाव येथील नवोदय विद्यालय समितीतर्फे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत नुकतीच घेाषणा करण्यात आली. त्यानुसार नवोदय विद्यालय समितीकडून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी निवड चाचणीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागणविण्यात येत आहेत.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे तर 20 जानेवारी 2024 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्याकरिता इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना येत्या 10 ऑगस्ट 2023 पर्यंत https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

 

राज्यातील नवोदय विद्यालयामध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. त्यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतानाच यासाठीच्या निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते. परीक्षेतील गुणांच्या आधारे गुण अनुक्रमांकानुसार हे प्रवेश दिल जातात. या विद्यालयामधील 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज https://navodaya.gov.in या संकेतस्थाळावर सादर करावे, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी कळविले आहे.