कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे “कृषि दिन ” साजरा

कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे “कृषि दिन ” साजरा

 

कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या तर्फे हरीत क्रांतीचे जनक, शेतक-यांचे कैवारी, कृषि विद्यापिठाचे जनक, पंचायतराज, श्वेतक्रांती व रोजगार हमीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या ११० व्या जयंती निमित्य १ जुलै २०२३ रोजी कृषि दिनाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्हि.जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही, प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. मच्छिंद्र घिगु रामटेके, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, केव्हीके सिंदेवाही आणि प्रविण माटेटवार, यशश्री, मोटर, चिमुर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय एन.सिडाम यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषिमधील केलेल्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांनी शेतक-यांसाठी उदगारलेले “शेती ही उदयोगाची जननी आहे, शेती संपन्न झाली तर लोकशाही संपन्न होईल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल” या महत्वपुर्ण उदगाराचे स्मरण केले. तसेच कृषि दिन साजरा करण्याची पार्श्वभुमी याविषयी माहिती दिली. श्री. विलासजी गुरनुले, प्र.शे. आणि सौ.वर्षाताई लांजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी खरीप पिकाचे नियोजन, धान पिकाच्या लागवडीच्या विविध पद्धती आणि खतांचे योग्य नियोजन तसेच यांत्रिकीकरणाचे महत्व आणि शेतक-यांनी तिनसुत्रीमध्ये उत्पादन वाढीवर भर, लागवड खर्च कमी करून उत्पादित मालावर प्रक्रीया करून शेतक-यांनी आपली आर्थीक उन्नती घडवावी असे आवाहन केले. आणि “कृषिसेवा हीच समाजसेवा” असे आपले मत व्यक्त केले. शेतकरी बांधवांना खरीप हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एस.एन.लोखंडे आणि आभारप्रदर्शने कु. स्नेहा वेलादी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. एन. डी. बारसागडे, श्री. कैलास कामडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.