पशुपालकांनी गोठयाची फवारणी करावी  :-  पशुसंवर्धन विभाग

पशुपालकांनी गोठयाची फवारणी करावी  :-  पशुसंवर्धन विभाग

       भंडारा, दि. 21 : गेल्या वर्षी गोधनावर मोठया प्रमाणावर  लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. लम्पी रोगाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून  पशुपालकांनी त्यांच्याकडील गोधनाचे लसीकरण करून घेण्योच आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  केले आहे.

       जिल्हयात मे महिन्यापर्यत किरकोळ  बाधित पशु आढळून आले.सध्या जिल्ह्यामध्ये लम्पी बाधित पशुंची संख्या निरंक आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पशुपालकांनी   लसीकरण करुन घेणे  आवश्यक आहे .कारण लम्पी या साथ रोगामध्ये लसीकरण हा एकमेव रोगापासून बचाव करण्याचा उपाय आहे.

       तसेच जिल्ह्यामध्ये उपलब्ध पशुधनाच्या 100 टक्के लम्पी रोग प्रतिबंधासाठी लस मात्रा उपलब्ध झाले आहेत.व लसीकरण सुध्दा सुरु झाले आहे.तरी पशुपालकांनी गाय जनावरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधाकरिता लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. नुकतीच लम्पी चर्मरोग जिल्हा नियंत्रण समितीची च्या सभेमध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.त्याकरिता पशुपालकांनी त्यांचे  पशुंना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन लसीकरण करून घ्यावे.

        तसेच पावसाळयात होणाऱ्या डास,माश्या व गोचीड गोमाशा यांची उत्पत्ती वाढून जनावरांना चावा घेतल्यास रोगाचा प्रसार होण्यास मदत होते.त्याकरिता पशुपालकांनी ग्रामपंचायतच्या मदतीने गोठयांची फवारणी करुन रोग पसरवणाऱ्या कीटकांचा नायनाट करावा.व संशयित पशुरुग्ण आाढळल्यास वेळीच अशा जनावरांना विलगीकरण करुन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनानी केले आहे.