तलाठी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

तलाठी परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

भंडारा, दि. 21 :  जिल्हयात 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान तीन सत्रात तलाठी परिक्षा जिल्ह्यातील उपकेंद्रावर घेण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडतील व तेथील परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी,म्हणून सदर परीक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यत फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 144 अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आवश्यक झाले.

       त्यामुळे  जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाण्याच्या दृष्टीने या  परीक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरावरील पुढील बाबी कृत्य करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.

 या 200 मीटर  निषिध्द क्षेत्रात झेरॉक्स मशीन व फॅक्स तसेच एस.टी.डी.बुथ परीक्षा कालावधीत सुरु राहणार नाही.परीक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल, फोन लॅपटॅाप, पेजर, टेपरेकॉर्डर ,कॅमेरा इत्यादीचा वापर करता येणार नाही. निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे,भाषणे करणे,घोषणा करता येणार नाही.तसेच पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाही.यांची संबंधितानी नोंद घ्यावी,असे जिल्हादांधिकारी यांनी कळविले आहे.

                   पोलिस अधिक्षक,भंडारा यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निमार्ण होणार नाही.या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक पोलिस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी.सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द फौजदारी नियमातंर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.