मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित Ø प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित

 

Ø प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

चंद्रपूर, दि.25 : सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आदी योजना राबविण्यात येतात. या योजनांचे अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे.

 

समाजकल्याण विभागाने या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या योजनांचे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. या महाविद्यालयांनी अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे अद्याप सादर केलेले नाहीत.

 

ही आहेत शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित महाविद्यालये:

 

बल्लारपूर इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी, गुरूनानक ज्युनिअर अॅन्ड सिनियर कॉलेज शिवाजी वॉर्ड बल्लारपुर, एन.एच.कॉलेज ब्रह्मपुरी, महाराष्ट्र इंन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (बि.फॉर्म.)बेटाळा, डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपुर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी चंद्रपुर, श्री. साई पॉलीटेक्निक चंद्रपुर, रिनायसन्स इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दाताळा, रिनायसन्स पॉलिटेक्निक चंद्रपुर, श्री. साई प्रायव्हेट आय.टी.आय. चंद्रपुर, आनंद निकेतन ऑर्ट कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज वरोरा, या महाविद्यालयाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

 

संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपआपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठवावे. तसेच विद्यार्थी लॉगीन त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पूर्तता करून पुनश्च अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठवावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.