अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 14: बाबुपेठ, रेल्वे क्रासिंग जवळ एक अनोळखी पुरुष पडून असल्याचे आढळून आला. सदर व्यक्तीस  स.फौ. गंगाराम पेंढारकर यांनी सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल केले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याबाबत शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

सदर व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्ष असून उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा, केस पांढरे दाढी-मिशी पांढरी, चेहरा लांबट, रंग सावळा, अंगात निळया रंगाचा टि-शर्ट, निळ्या रंगाचा हॉफ पॅन्ट परीधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.