चंद्रपूर : सरकारी धान्य ट्रक चोरीचा अवघ्या दोन तासात लावला तपास

चंद्रपूर : सरकारी धान्य ट्रक चोरीचा अवघ्या दोन तासात लावला तपास

पोलीस स्टेशन पडोलि हद्दीत सरकारी धान्याच्या ट्रक क्रमांक एम एच 34 बीजी 3907 त्रिमूर्ती हॉटेल जवळून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केला आहे यावरून पोलीस स्टेशन पडली येते गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर ट्रक चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच या बाबत माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना होऊन शोध सुरू केला.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री खाडे यांना आणि त्यांचे अधिनस्त पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की सदरचा चोरीस गेलेला ट्रक हा बल्लारपूर दिशेने गेलेला आहे.

ट्रकला विसापूर टोलनाक्याजवळ अडवून ट्रक चालवीत असलेला आरोपी नामे दिगंबर बाबपूराव केंद्रे वय 26 वर्ष राहणार वंजारी गुडा पोस्ट लींगापुर तालुका शिरपूर जिल्हा आदीलाबाद तेलंगाना यास ताब्यात घेतले .
सदर आरोपी कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल 20 टन शासकीय धान्य किंमत चार लाख रुपये आणि ट्रक ची किंमत अकरा लाख रुपये असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री अरविंद साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री खाडे यांचे नेतृत्वात जितेंद्र बोबडे , राजेंद्र खनके , महेंद्र भुजाडे , जमीर खान , मिलिंद चव्हाण , अनुप डांगे , गणेश भोयर , प्रदीप मडावी , गणेश मोहुर्ले , गोपीनाथ नरोटे , विनोद जाधव यांनी केली आहे.