chandrapur I सिंदेवाही पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यां विरुद्ध धाडसत्र सुरूच

सिंदेवाही पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यां विरुद्ध धाडसत्र सुरूच

दिनांक 28/05/2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर, व पोलीस पथक यांनी एक डस्टन गो मोटार कार किंमत 6 लाख, त्यामध्ये 240 विदेशी दारू असलेल्या काचेच्या बाटली 180 मिलने भरलेल्या किंमत 96,000/- असा एकूण 6,96,000 / – रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
व एक टाटा इंडिगो मोटार कार किंमत 5 लाख त्यामध्ये 144 नग विदेशी दारू असलेल्या काचेच्या बाटल्या मध्ये 180 मिलिने भरलेल्या किंमत 57,600,/- रुपये असा एकूण 5,57,600/- रुपयांचा माल मिळून आला.
असा दोन्ही गाडी व नमूद माल किंमत 12,53,600 /- रुपयांचा मालं मिळून आल्याने तीन फरार आरोपी वर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्री योगेश घारे हे करीत आहेत.