भंडारा : शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबरला

शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबरला

भंडारा, दि. 17: जिल्ह्यात येत्या 21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये दोन पेपर होणार असून पहिल्या पेपर करीता 4 हजार 646 व दुसऱ्या पेपर करीता 3 हजार 530 इतके परीक्षार्थी परीक्षेला बसलेले आहेत. जिल्ह्यात पेपर एक करिता एकोणवीस परीक्षा केंद्रे असून पेपर दोन करिता 14 परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेस येतांना प्रवेश पत्रासोबत विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, यापैकी मूळ ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी वीस मिनिटे आधी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल, त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी, पर्यवेक्षक, समावेशक, लिपिक शिपाई यांना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. परीक्षार्थीनी मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजिटल डायरी किंवा अन्य प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन वह्या, पुस्तके आणू नयेत. असे साहित्य केंद्राच्या परीक्षागृहात बाळगण्यास व वापरण्यास मनाई आहे. असे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. परीक्षेतील कर्मचारी व परीक्षार्थींनी कोविड-19 नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक एम. एम. बारस्कर, भंडारा यांनी कळविले आहे.