शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा संपन्न

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा संपन्न

सिंदेवाही प्रतिनिधी : विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा दिनांक ०४.०८.२०१३ रोजी शुक्रवारला दुपारी २:०० वाजता विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे प्रगतशील शेतकरी मा. माधव आदे तसेच इतर शेतकरी सदस्य व कृषि महाविद्यालय, मुल रावेच्या १८ मुली इतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. गौतम शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार विभागीय कृषि संशोधन केंद्र यांनी धान पीक व्यवस्थापन या विषयावर पी. पी. टी. द्वारे सादरीकरण करून विस्तृत मार्गदर्शन केले. यामध्ये भात रोवणी, पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ई. तसेच उशिरा रोवणी करतांना करावयाच्या उपाययोजना, तुडतुड्याच्या व्यवस्थापनासाठी पट्टा पध्दत एसआरआय पध्दत इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. विनोद नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी धान पिकातील तणाचे व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन शेतक-यांना केले. डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी धान पिकावरील
कीड जसे कि खोडकिडी, गादमाशी, तुडतुडे व इतर किडी तसेच त्याचे व्यवस्थापन या विषयावर पी. पी. टी. द्वारे सादरीकरण करून विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी धानपिक लागवडीमध्ये उपयोगात येणा-या अवजारे व यंत्राची माहिती शेतक-यांना दिली. सदर सभेदरम्यान शेतकरी चर्चा सत्रामध्ये शेतक-यांच्या विविधी प्रश्नाचे निराकरण डॉ. अनिल कोल्हे. डॉ. गौतम शामकुवर व डॉ. विनोद नागदेवते यांनी केले. सदर कार्यक्रमास एकूण ३५ शेतकरी, राधेच्या मुली व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष नागदेवे तर धरमचंद गणविर आभार मानले.