आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत फिट इंडिया फ्रिडम रन चे आयोजन

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत

फिट इंडिया फ्रिडम रन चे आयोजन

भंडारा,दि.20 : भारताच्या स्वातंत्र्य प्राप्ती ला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया फ्रिडम रन चे आयोजन 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. या युवा दौडचा शुभारंभ महात्मा गांधी चौक भंडारा येथे खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव उपस्थित राहणार आहे. या युवा दौड मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी केले आहे.