योग्य उपचार व औषधोपचाराने एचआयव्ही एड्सवर मात करू शकतो – दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधीश जयदिप पांडे

योग्य उपचार व औषधोपचाराने एचआयव्ही एड्सवर मात करू शकतो – दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधीश जयदिप पांडे

 

नागपूर, दि. 27 : न्याय सर्वांसाठी समान असून एडस आजाराने पीडीत नागरिकांनी खचून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य उपचार व औषधोपचारानी या आजारावर मात करु शकतो, असा सल्ला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर श्री. जयदिप पांडे यांनी उपस्थितांना दिला.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नुकताच शताब्दी चौक, बेलतरोडी रोड, राहाटे नगर टोली, नागपूर येथील परिसरात ‘जागतिक एड्स दिवस, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस, दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, 2016’ या विषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महानगर पालीकेचे जन्म-मृत्यू विभागाचे प्रभारी सांख्यिकी अधिकारी मुकेश शंभरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे उपस्थित होते. भविष्यात अशा चुका होणार नाही व आपल्यापासून आजाराचा प्रसार होणार नाही याकडे विशेष देण्याचे आवाहन न्या. पांडे यांनी केले. या आजाराविषयी जागरुकता नसल्याने बाधीत व्यक्तींना चांगली वागणूक मिळत नाही. कायद्यानूसार सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अपेक्षीत आहे. त्यांना सुध्दा जगण्याचा अधिकार आहे. त्यांना कामावरुन काढता येत नाही, समान्य व्यक्तीप्रमाण जगण्याचा व काम करण्याचा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाची प्रास्ताविक करतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यांनी उपस्थितांना सांगीतले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वेळोवेळी समाजातील नागरिकांकरीता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येते, तसेच गरीब गरजु व्यक्तींना मोफत सहाय्य व सल्लाबाबत माहिती दिली जाते.

 

त्यांनी उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे एच. आय. व्ही. एड्स, दिव्यांग व्यक्तींचे अधिकार याबाबत माहिती देण्याकरीता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगीतले. मुकेश शंभरकर यांनी जन्म-मृत्यु प्रमाणपत्राविषयी मार्गदर्शन केले. मान्यवरांनी त्यांचे यथोचित उत्तरे देऊन समाधान केले.

 

याप्रसंगी 250 च्या वर परिसरातील पुरुष, महिला व बालके तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर चे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यांनी केले तर आभारप्रदर्शन रहाटे नगर टोलीमधील युवक रूपेश यांनी केले.