मुलचेरा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

मुलचेरा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

गडचिरोली,दि.31: मुलचेरा तालुक्यातील साजामधील कोतवालांच्या 02 रिक्त पदभरती-2023 चा जाहिरनामा व कोतवाल भरतीचे वेळापत्रक तहसिल कार्यालय, मुलचेरा येथील नोटिस बोर्डावर तसेच ग्रामपंचायत देवदा व सुंदरनगर येथे त्याचप्रमाणे नगरपंचायत, मुलचेरा येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलचेरा तालुक्यातील नॉनपेसा क्षेत्रातील देवदा गावात इमाव प्रवर्गातून व सुंदरनगर गावामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातील रिक्त जागांवर कोतवाल पदाची भरतीची प्रक्रिया सुरु केली असल्याचे तहसिलदार, मुलचेरा चेतन एस. पाटील यांनी कळविले आहे.