ताडोबा जंगल सफारी बुकींग रकमेच्या अपहार प्रकरणी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनच्या दोघांसंचालकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताडोबा जंगल सफारी बुकींग रकमेच्या अपहार प्रकरणी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनच्या दोघांसंचालकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलीस स्टेशन रामनगर येथे फिर्यादी श्री सचीन उत्तम शिन्दे, विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक 10/12/2021 ते 17/08/2023 दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाईन बुकींग करणे करीता (1) अभिषेक विनोदकुमार ठाकुर (2) रोहीत विनोदकुमार ठाकुर दोन्ही रा. प्लॉट क्र. 64 गुरुद्वारा रोड चंद्रपूर यांचे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांचे दरम्यान दिनांक 10/12/2023 रोजी सर्विस लेवल अर्गिमेंट द्वारे अटी व शर्तीवर कायदेशीर करार झाला होता. परंतु सदर आरोपीत कंपनी / संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले. त्यावरुन ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा चंद्रपूर (टी.ए.टी. आर.) ने सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षाच्या ऑडीट करण्यात आले. त्या ऑडीट अहवालात नमुद नुसार सदर कालावधीमध्ये आरोपीत कंपनी / संस्थेने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यास 22,80,67,749/- रुपये देणे होते. त्यापैकी त्यांनी 10,65,16,918/- रु. भरणा केला आहे. सफारी बुकींगची उर्वरीत रक्कम 12,15,50,831 /- रुपये टी. ए.टी.आर. ला भरणा न करता आरोपीत कंपनी / संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन विश्वासघात करुन रुपये 12,15,50,831 / – शासकीय रक्कमेचा अपहार केला. अशा रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनचे संबंधीत आरोपी (1) अभिषेक विनोदकुमार ठाकुर (2) रोहीत विनोदकुमार ठाकुर दोन्ही रा. प्लॉट क्र. 64 गुरुद्वारा रोड चंद्रपूर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक 937 / 2023 कलम 420, 406 भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.