एटापल्ली तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

एटापल्ली तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

गडचिरोली,()दि.31: एटापल्ली तालुक्यातील मौजा- हिकेर, कोईदवर्षी, सोहगांव, मंजीगड, एटापल्ली, जांभुळगट्टा व मंगुठा या गांवात पेसा अंतर्गत कोतवाल संवर्गाची पदभरती करावयाची आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात विस्तृत माहितीसाठीचा जाहिरनामा संबंधित गावाचे चावळी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, तसेच तहसिल कार्यालय एटापल्ली येथील नोटीस बोर्डावर दिनांक 31.07.2023 रोजी प्रसिद्ध करण्यांत आलेला आहे.
पात्रतेच्या अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्यांनी आपले अर्ज तहसिल कार्यालय, एटापल्ली येथे सादर करावे. असे आवाहन सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, एटापल्ली प्रविण चौधरी यांनी कळविले आहे.