प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लाईसेंस कॅम्पचे आयोजन

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लाईसेंस कॅम्पचे आयोजन

 चंद्रपूर, दि. 7 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात येत आहे. सदर शिबीरमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहे. या बाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

शिबीर ठिकाण 1) शासकीय विश्रामगृह, वरोरा येथे 21 मार्च 2024 रोजी 2) शासकीय  विश्रामगृह ब्रम्हपुरी, येथे 22 मार्च 2024  3) शासकीय विश्रामगृह, चिमूर येथे 26 मार्च 2024 रोजी 4) शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी येथे 27 मार्च 5) शासकीय विश्रामगृह, गडचांदुर येथे 28 मार्च 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे.