ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

       भंडारा दि.31:जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांसाठी तसेच निधन, राजीनामा, अनर्हता, कींवा इतर अन्य कारणांमुळे 30 जूनपर्यत ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रीक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरीता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा सुधारीत मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याबाबत  राज्य  निवडणूक आयोगाने  निर्देश दिले आहेत.

        या कार्यक्रमात सन 2022 मध्ये मुदत संपलेल्या भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण चुकीचे झाल्याने या 58 ग्रामपंचायती मागील निवडणूकांमधून वगळण्यात आल्या होत्या.या 58 ग्रामपंचायतींचा समावेश मतदार यादी कार्यक्रमात करण्यात येत आहे.सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम मतदार यादीचा पूढीलप्रमाणे आहे –

मतदार यादी ग्राहय धरण्याचा दिनांक 1 जुलै 2023 आहे.

       तर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दि.10.8.2023 हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 10.8.2023 ते 21.8.2023 पर्यत आहे. तर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यत आहे. त्यानुषंगाने मतदार यादी कार्यक्रमासंदर्भात कार्यवाही करून 6 जुलै 2023 च्या निर्देशांचे पालन करण्यात यावे.व मतदार यादीचा  कार्यक्रम राबवुन दि.10 ऑगस्ट 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसीध्द केल्याचा अहवाल व दि.25 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक विभाग श्रीपती मोरे यांनी दिले आहेत.