पुण्यश्लोक व अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित 15 ऑगस्टपर्यत मुदत

पुण्यश्लोक व अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित 15 ऑगस्टपर्यत मुदत

 

          भंडारा, दि. 31 : महिला  व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय  कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे.तसेच राज्यस्तरीय पुरस्कार महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामाचा 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा,ज्या महिलानां जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार,दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे.त्या महिला तो पुरस्कार मिळण्याच्या 5 वर्षापर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

       तसेच चारित्र चांगले असल्याबाबत व त्यांचे विरुध्द कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार न केल्याबाबतचे विभागीय पोलिस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जोडावे, व विभागीय पुरस्कार महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 10 वर्ष कार्य असावे.

     विभागीय पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत असावी,संस्थेचे दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा.संस्था राजकारणापासून अलिप्त असावी,तीचे कार्य व सेवा हि पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी,संस्थेचा सर्व सदस्यांचा ठराव जोडावा,संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र प्रमाणपत्र व संस्थांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्या बाबतचे विभागीय पोलिस अधिक्षक,यांचे प्रमाणपत्र जोडावे.

          तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे,ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे.त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार देता येणार नाही.व चारित्र चांगले असल्या बाबत व त्यांचे विरुध्द कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार न केल्याबाबतचे पोलिस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जोडोव,

         इच्छुक व्यक्ती महिला किवा संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव 15 ऑगस्ट 2023 पर्यत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,कार्यालय,पहिला माळा,भुविकास बॅक,शिवाजी क्रिडा स्टेडियम समोर,व कार्यालयाचे संपर्क क्रमांक 07184-253400 येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यांनी कळविले आहे.