10 मार्च रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन / उपस्मार, फिट, मिरगी (इपिलेप्सी) बाबत आरोग्य तपासणी

10 मार्च रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
उपस्मार, फिट, मिरगी (इपिलेप्सी) बाबत आरोग्य तपासणी

गडचिरोली, दि.05:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2023-24 या सत्रात गडचिरोली जिल्ह्यात दि.10 मार्च 2024 रोज रविवारला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे बाह्य रुग्ण विभागात सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेस आकडी अपस्मार, फिट, मिरगी (इपिलेप्सी) शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरादरम्यान तज्ज्ञ न्युरोफिजीशियन मार्फत तपासणी व उपचार, ई.ई.जी, रक्त तपासणी, समुपदेशन, भौतिकोपचार, व्यवसयोपचार, वाचा व भाषा विकार उपचार, 3 महिन्यांची औषधे इत्यादी सुविधा देण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी संपर्क क्रमांक-07132-222340/222320 व आरोग्य विषयक सल्ला व माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 104 असा आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. प्रमोद खंडाते यांनी कळविले आहे.