प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

गडचिरोली, दि.19:जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्यावतीनेदिनांक 25 जुलै2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली येथेठिक 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यांत येत आहे.

अ.क्र. कंपनीचे नाव पदाचे नांव रिक्तपदे वेतन

1 स्वतंत्र मायक्रो फायनान्स्‍ा, गडचिरोली फिल्ड ऑफीसर 100 रु.14200/-

प्रवास खर्च वेगळा

सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये वरील कंपनी उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगाराचा लाभ्‍ घेण्यासाठी‍ सदर प्लेसमेंट ड्राईव्हकरिता ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चानेदि. 25 जुलै 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली शासकीय संकुल बॅरेक न. 2 कॉप्लेक्स एरिया, पोलीस मुख्यालयासमोर, येथे उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.