नेहरू नगर येथील २ नळधारकांची नळ जोडणी खंडित

नेहरू नगर येथील २ नळधारकांची नळ जोडणी खंडित

 

चंद्रपूर १२ जून – पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कर वसुलीसाठी मनपाद्वारे १२ पथके गठीत करण्यात आली असुन पाणीपट्टी कर थकीत असल्याने नेहरू नगर वार्ड येथील विद्या शंकर कुंभारे व मंगेश शंकर साळूखे़ यांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे.

मनपाचे ५१ अधिकारी – कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत असुन थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे. नेहरू नगर येथील या दोन्ही नळधारकांकडे ६५११ रुपयांची थकबाकी होती.वारंवार वसुली पथकाद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही सदर नळधारकांनी कराचा भरणा न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत वसुली पथकांद्वारे १०४ नळधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले असुन थकबाकीदारांवर सातत्याने कारवाई केली जात आहे.

नळधारकांनी थकीत कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करावा तसेच www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा पाणीपट्टी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.