मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

गडचिरोली, दि.18: भारत निवडणूक आयोगाचे निर्देशान्वये मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक 15 जुन 2023 नुसार दिनांक 01.01.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे द्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी – दिनांक 21 जुलै 2023 (शुक्रवार) ते 21 ऑगस्ट 2023 (सोमवार), मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे., दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रृटी दुर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे., विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन, मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधुन फरक दुर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे- दिनांक 22 ऑगस्ट 2023 (मंगळवार) ते दिनांक 29 सप्टेंबर 2023 (शुक्रवार). , नमुना 1-8 तयार करणे, 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे- दिनांक 30 सप्टेंबर 2023 (शनिवार) ते दिनांक 16 ऑक्टोबर 2023 (सोमवार). पुनरिक्षण उपक्रम- एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे- दि.17 ऑक्टोंबर 2023 (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी- दि. 17 ऑक्टोंबर 2023 (मंगळवार) ते 30 नोव्हेंबर 2023 (गुरुवार). विशेष मोहिमेचा कालावधी- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन दिवस शनिवार आणि रविवार. दावे व हरकती निकालात काढणे- दि. 26 डिसेंबर 2023 (मंगळवार) पर्यंत. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई – दिनांक 1 जानेवारी 2024 (मंगळवार) पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध करणे- दि.05 जानेवारी 2024 (शुक्रवार).

सदर पुनरिक्षण कार्यक्रम हा दि. 01.01.2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असेल. सदर कार्यक्रम वरील वेळापत्रकानुसार राबवायचा आहे. तरी ज्या पात्र मतदाराचे जन्म दिनांक 01.01.2005 रोजी किंवा पुर्वी झाले असल्यास यांनी अर्हता दिनांक 01.01.2024 रोजी वयाचे 18 वर्ष पुर्ण होत आहे. किंवा त्यापुर्वी होत आहे. त्यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तसेच तहसिल कार्यालय, आरमोरी (निवडणूक विभाग) येथे जाऊन नव्याने नोंदणी करण्यासाठी नमुना -6 फॉर्म पुराव्यासह भरण्यात यावे. तसेच मा. भारत निवडणूक आयोग यांचे द्वारे विकसीत केलेले NVSP (National Voter Service Portal), VHA(Voter Helpline App) Voter Portal या ऑनलाईनच्या माध्यमातुन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे. असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 067- आरमोरी (अ.ज.), विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार, आरमोरी एस.डी. माने यांनी केले आहे.