तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी 14 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी 14 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

 

चंद्रपूर, दि. 10 : युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, केंद्र शासनाद्वारे दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि.14 जुलै, 2023 पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत.

तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्यासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन, ऑनलाईन अर्ज सादर करावा. पुरस्कारासाठी नामांकन सादर करणा-या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे. तसेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे.

राज्यातील सर्व साहसी उपक्रम करणा-या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, अविनाश पुंड यांनी कळविले आहे.