जिल्हयात 2 हजार 253 शेतक-यांना 18 कोटीहून अधिक चुकारे अदा

जिल्हयात 2 हजार 253 शेतक-यांना 18 कोटीहून अधिक चुकारे अदा

–  पणन विभागाची माहिती

 भंडारा,दि. 06 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरिप पणन हंगाम 2023-24  अंतर्गत शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये धान 224 धान केंद्रावरखरेदी सुरू आहे. ज्या धान खरेदी केंद्राच्या हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार   पाच डिसेंबर रोजी 2 हजार 253 शेतक-यांचे  84851.19  क्विं.  धानाचे  18 कोटी 52 लाख 30 हजार 147 रूपये चुकारे शेतक-यांना अदा करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे.