सामूहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्या दाम्पत्याकरिता कन्यादान योजना

सामूहिक विवाह सोहळयात विवाह करणाऱ्या दाम्पत्याकरिता कन्यादान योजना

 

भंडारा, दि. 6: सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्याकरीता कन्यादान योजना सन 2019-20 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या वधुच्या पालकास रुपये 20 हजार व संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे रुपये 4 हजार इतके अनुदान देण्यात येते.

 

या योजनेअंतर्गत सन 2023-24 वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सामुहिक विवाह सोहळ आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रासह 31 जुलै 2023 पर्यत अर्ज सादर करावे. अर्जाचा नमुना समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे, असे समाज कल्याण कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.