खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी क्षेत्रात भाजपाच्या महा-जनसंपर्क अभियानाला सुरुवात.

खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी क्षेत्रात भाजपाच्या महा-जनसंपर्क अभियानाला सुरुवात.

ब्रह्मपुरीच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घेतल्या भेटी.

ब्रह्मपुरी २१ जून २०२३

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्रभाई मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर मोदी @9 हे अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात भाजपने महा-जनसंपर्क अभियानाची सुरवात केली. या वेळी त्यांनी ब्रह्मपुरी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेत, मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.

या मध्ये ब्रह्मपुरी मधील प्रसिद्ध डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर, उद्योगपती रामावतारजी अग्रवाल, धनेश अग्रवाल, प्रगतशील शेतकरी व व्यापारी रमेशजी जिभकाटे, प्रसिद्ध डॉ. धनंजय नाकाडे, शासकीय तंत्रनिकेतन येथील विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र राचलवार, प्रा. आशिष ठेंगरी, ने.ही महाविद्यालयातील शिपाई दामू करंबे यांची या दरम्यान खासदार नेते व माजी आमदार प्रा. देशकर यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भेट घेतली.

या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, माजी पं.स सभापती तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. रामलाल दोनाकडर, शहर महामंत्री विक्रम कावळे, साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, युवा मोर्चाचे पंकज माकोडे, पवन जयस्वाल, रजत थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.