2 ऑक्टोंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सायकल रॅलीचे आयोजन Ø स्वच्छता व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

2 ऑक्टोंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत

सायकल रॅलीचे आयोजन

Ø स्वच्छता व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर दि. 1 ऑक्टोबर : ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जिल्हा न्यायालय, चंद्रपूर आणि सर्व शासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचा शुभारंभ महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथून सायकल रॅलीला प्रारंभ होणार आहे. सदर रॅली  जिल्हा परिषद कार्यालय-जटपुरा गेट मार्गे- महात्मा गांधी पुतळा- कस्तुरबा गांधी चौक मार्गे पुनश्च न्यायालयापर्यंत येईल. सदर रॅलीचे अंदाजे अंतर चार किलोमीटर  असणार आहे. रॅलीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर सकाळी 12 वाजता जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथील सभागृहात यानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे, असे अधीक्षक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.