ज्येष्ठ कार्यकर्ता हेच भाजपचे मुख्य आधार…खासदार अशोकजी नेते

ज्येष्ठ कार्यकर्ता हेच भाजपचे मुख्य आधार…खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन…

ज्येष्ठ कार्यकर्ता व सेवानिवृत्त कर्मचारीवृंद संम्मेलन खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला…

दिं.२० जून २०२३

वडसा: सक्षम भारताची विकसित वाटचालीस नववर्ष पूर्ण झाली. मोदी @ ९ महा – जनसंपर्क अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ता व सेवानिवृत्त कर्मचारीवृंद संम्मेलन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली सिंधू भवन हुतात्मा स्मारक जवळ देसाईगंज (वडसा) या ठिकाणी संपन्न झाला.

 

यावेळी प्रामुख्याने मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,सहकार महर्षी तथा आरमोरी विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाशजी साव. पोरेडुीवार, आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारी सदस्य रवींद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालभाई कुकरेजा, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेव फाये,जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे बबुभाई हुसैनी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी,ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे ईश्वर फासेवार, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सदानंद कुथे,उपस्थितीत होते.

 

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक जी नेते यांनी बोलतांना

भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांची आठवण आणि त्यांच्याप्रती मानसन्मान व आदर ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे, तेच कार्यकर्ते खऱ्या अर्थाने भाजपच्या शिल्पकाराचे प्रतीक आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मोदी @९ हा उपक्रम देशभरात सुरू करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून या अभियानांतर्गत , ज्येष्ठ कार्यकर्ता व सेवानिवृत्त कर्मचारीवृंद संमेलन आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्ष करून देशात भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करून सत्तेपर्यंत पोहचवले आहे. मोदी सरकारच्या पेन्शन योजना, जन धन योजना, हेल्थ कार्ड इत्यादी योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सुख-सुविधा देण्याचे काम मागील ९ वर्षांत प्रधानमंत्री मोदीजींनी केले आहे,असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून खासदार अशोकजी नेते यांनी केले.

 

याप्रसंगी आ.कृष्णाजी गजबे, किसनजी नागदेवते, प्रकाश साव.पोरड़ीवार,चांगदेव फाये तसेच जेष्ठ कार्यकर्ता रामभाऊ पडोळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीलालभाई कुकरेजा,संचालन सदानंद कुथे सर व आभार प्रदर्शन सुनिल पारधी यांनी केले.

 

आदी पदाधिकारी,ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.