खरीप हंगामातील पिक नियोजन

खरीप हंगामातील पिक नियोजन

भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले नाही.सध्यस्थितीत दजून 20महिन्यात आतापर्यंत 138.40 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात 16.40 मिमी (सरासरीच्या 11 टक्के) पाऊस पडलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून दि. 20.06.23 अखेर प्रत्यक्षात 1.98 लाख हेक्टर (1.30टक्के) पेरणी झालेली आहे .
महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचे आगमनास विलंब होत असल्याने शेतकरी काळजीत आहे. या दृष्टीकोणातून शेतक-यांनी पेरणी करताना कोणती दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन पिक परिस्थितीत काय नियोजन करावे याबाबत मा. कृषि मंत्री महोदयांनी मा.अपर मुख्य सचिव कृषी, आयुक्त कृषी , सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणी भारतीय हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री. के.एस. हौसळीकर यांच्या समवेत दि.२०/०६/२०२३ रोजी बैठक घेवून सर्व संबधितांबरोबर चर्चा केली. त्यानुसार हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे.यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Mansoon Period) येण्याचा कालावधी 24 ते 25 जून असेल असा वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजानुसार दि. 24 व २5 जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.यासंदर्भाने शेतक-यांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
 शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये असे आवाहन करण्यात येत आहे.
 शेतक-यांनी 80 ते १०० मि.ली पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करण्यात येऊ नये.
 शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
 मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धुळ पेरणी करू नये.
 पेरणी करताना साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा.
 सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.
 पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ ) पेरणी करावी.
 जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन ( मल्चींग ) सारख्या तंत्राचा वापर करावा.
 हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल.
 कृषि विद्यापीठ,कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पिक नियोजन करण्यात येत आहे. क्षेत्रीय यंत्रज्ञांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.
 राज्यात मान्सूनचा अंदाज घेवून पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे , खते व किटकनाशके
शेतक-यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.
 शेतक-यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणा-या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होइल यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 शेतक-यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी 1800-2334000 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

सुनील चव्हाण भाप्रसे
आयुक्त कृषी
महाराष्ट्र राज्य