सन 2023-24 करीता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश सुरु

सन 2023-24 करीता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश सुरु

गडचिरोली, दि.21: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 13 मुलांचे व 8 मुलींचे असे एकूण 21 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता 2115 असून त्यातील सन 2023-24 करीता रिक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता 11 वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत अठरा वसतीगृहात इयत्ता 8 वी पासुन पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

वरील संकेतस्थळ विद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता खुले करण्यात आलेले असुन नविन विद्यार्थी इयत्ता 8 वी करीता व जुने विद्यार्थी 9 वी, 10 वी व 12 वी करीता अर्ज करु शकतात. त्यामुळे विद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा व ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्डकॉपी संबंधीत वसतीगृहात सादर करावे. असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.