भंडारा : जिल्ह्यातील 58 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

जिल्ह्यातील 58 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

भंडारा, दि. 22: जल जीवन मिशन अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 25 कोटी 44 लाख 99 हजार रुपये किंमतीच्या  58 पाणी पुरवठा योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या 15 लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.  मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. एस. कोल्हे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तथा सदस्य सचिव व्ही. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग गोंदिया अनंत जगताप, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे एस. कापगते, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा तुमसर डी. के. देवगडे, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा भंडारा एच. आर. खोब्रागडे, उपविभागीय अभियंता यांत्रिकी विभाग एन. डी. पाटील उपस्थित होते.