तरच देशाचा विकास होईल कुलगुरू -डॉ.शरद गडाख

शेतकऱ्यांचा विकास झाला तरच खेड्यांचा विकास होईल व खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल कुलगुरू -डॉ.शरद गडाख

कृषि विज्ञान केंद्र,सिंदेवाही जि.चंद्रपूर तर्फे आदर्श गाव नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

आर्थिक विकासाठी शेतकरी बांधवानी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करा कुलगुरू -डॉ.शरद गडाख

दि.१७/०६/२०२३ रोजी कृषि विज्ञान केंद्र,सिंदेवाही जि.चंद्रपूर तर्फे आदर्श गाव नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.शरद गडाख, कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.धनराज उंदिरवाडे, मा.संचालक विस्तार शिक्षण डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला लाभले, प्रमुख उपस्थिती मध्ये मा.सौ. विद्याताई खोब्रागडे ,सरपंच, नाचनभट्टी, मा.कु प्रीती हिरळकर, प्रकल्प संचालक, आत्मा,चंदपूर, डॉ.विनोद गुलाबराव नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृ.वि.के., सिंदेवाही मा.श्री. मच्छिंद्र घीगु रामटेके, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृ. वि. के., सिंदेवाही, डॉ. जि. आर. शामकुवर, प्राध्यापक, वि. कृ. सं., केंद्र, सिंदेवाही, डॉ. व्ही. एन. सिडाम, डॉ.एस.एन.लोखंडे, डॉ,व्ही.वाय,जगदाळे, कु.एस.आर.वेलादी, श्री.संजय कोसुरकर प्र.तालुका कृषि अधिकारी ,सिंदेवाही व कृषी संलग्न अधिकारी ई. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.व्ही.जि.नागदेवते यांनी केले असून त्यामध्ये आदर्श गाव नाचनभट्टी येथील कृषि व कृषि संलग्न परिस्थितीचा अहवाल सादर केला, प्रमुख मार्गदर्शना मध्ये डॉ.धनराज उंदिरवाडे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ , अकोला अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तीन महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले यामध्ये आदर्श गाव संकल्पना, शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि विद्यापीठ आदर्श शेतकरी, या विषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांनी विद्यापीठ विकसित सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली व आपल्या गावाची आर्थिक उन्नती साधावी असे सुचविले, सौ.विद्याताई खोब्रागडे यांनी आदर्श गाव या उपक्रमाची प्रशंसा करून विद्यापीठ करीत असलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल कौतुक केले, श्री. श्री.मच्छिंद्र रामटेके, यांनी आदर्श गाव योजने बद्दल आपले मनोगत व्यक्त केले, कु.प्रीती हिरळकर यांनी आत्मा कार्यालया तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनातून मा.कुलगुरू ,डॉ.शरद गडाख यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ‘उत्पादकता दुप्पट करणे,लागवडी वरील खर्च कमी करून उत्पादित मालावर प्रक्रिया -मुल्यवर्धन करून पॅकेजिंग व मार्केटिंग, या तीन त्रिसूत्री चा अवलंब करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले तसेच कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर, ‘एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब, यामध्ये मुख्य पिका सोबत दुग्धव्यवसाय,कुक्कुट पालन, शेळी पालन,फळबाग,भाजीपाला लागवड या घटकांचा सामावेश करावा जेणेकरून आपली आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावेल. शेतकऱ्यांचा विकास झाला तर खेड्याचा विकास होईल व खेड्याचा विकास झाला तरी देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्ही.एन.सिडाम यांनी केले, तरी आभार प्रदर्शन डॉ.एस.एन.लोखंडे यांनी केले सदर कार्यक्रमाला आदर्शगाव नाचनभट्टी येथील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.