16 जून रोजी कापगते पेट्रोलपंप साकोली ते नागझिरा रोडच्या मधातील सर्व दुकाने बंद

16 जून रोजी कापगते पेट्रोलपंप साकोली ते नागझिरा रोडच्या मधातील सर्व दुकाने बंद

 

भंडारा दि.15: 16 जून 2023 रोजी साकोली येथे केंद्रीय रस्ते मंत्री भारत सरकार श्री. नितीन गडकरी यांचा दौरा कार्यक्रम असल्याने साकोली येथे गर्दी राहण्याची शक्यता आहे.

 

16 जून रोजी कापगते पेट्रोलपंप साकोली ते नागझिरा रोडच्या मधात येत असलेली सर्व दुकाने बंद करण्याकरिता सदर ठिकाणी 16 जून 2023 च्या सकाळी 7 वाजे पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सि.आर.पी.सी कलम 144 नुसार जमावबंदी आदेश पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी निर्गमित केले आहेत.