वने मंत्री सुधीर मुनगंटीवार 24 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत

वने मंत्री सुधीर मुनगंटीवार 24 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत

गडचिरोली, दि.23: वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 24 नोव्हेंबर 2023 रोजी गडचिरोली दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वा. पोलीस परेड ग्राउंड, गडचिरोली येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आगमन व
गडचिरोली जिल्ह्यातील म.औ.वि.म. भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथील आढावा बैठकीला उपस्थिती. सकाळी 11 वा. गडचिरोली जिल्हा म.औ.वि.म. व उद्योग विभाग (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आढावा बैठक. दुपारी 12 वा. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय, येथे चर्चा. दुपारी 12.30 वा. गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, येथे बैठक. दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, येथे पत्रकार परिषद. दुपारी 2.00 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. पोलीस परेड ग्राउंड, गडचिरोली येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण.