अनुसुचित जातीच्या पशुपालकांकडून शेवगा लागवड करण्यासाठी अर्ज आमंत्रीत

अनुसुचित जातीच्या पशुपालकांकडून शेवगा लागवड करण्यासाठी अर्ज आमंत्रीत

 

भंडारा, दि. 15 : अनुसुचित जातीच्या पशुपालकांकडून राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत पेरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी, पं.स. कार्यालयात उपलब्ध असून अर्जा सोबत आधार कार्ड, 7/12 नमुना, ओलिताखाली असल्याची नोंद अथवा पशुधन तपशील, बँक खाते, आधार संलग्नित शेतकऱ्या कडे किमान 10 गुंठे ओलिताची शेती असल्याचे कागदपत्र सोबत जोडावे.

ही योजना (गवत क्षेत्र विकास व साठा) वनक्षेत्र नसलेल्या ओसाड जमीन/ पडीत जमीन /गवती व चराऊ कुरण यामधून वैरण उत्पादीत करणे नावाने असून प्रती हेक्टरी 23 हजार 250 रूपये दोन समान हप्त्यांत शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यात DBT तत्वानुसार वितरित करण्यात येईल. अधिक माहितीकरिता पशुसंवर्धन विभाग पं.स. येथे संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वंजारी यांनी कळविले आहे.