भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख 25 मार्च 2024

भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख 25 मार्च 2024

गडचिरोली, दि.01: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सन 2023-24 करिता Mahadbtmahait. gov. in हे शिष्यवृत्ती/फ्रिशीप फॉर्म भरणेस्तव पोर्टल सुरु झालेले आहे. महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करुन तात्काळ भरुन घेण्यात यावे व त्यासंबंधीच्या सुचना महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना दयाव्यात तसेच सुचना सुचना फलकावर लावण्यात यावी. महाविद्यालयातील शिष्यवृत्ती हाताळणा-या लिपीकाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती/फ्रिशीप अर्जाची व आवश्यक असणा-या सर्व कागदपत्राची ऑनलाईन तपासणी करण्यात यावी. शिष्यवृत्ती/फ्रिशीप करिता पात्र असलेले सर्व अर्ज पुढील कार्यवाही करिता प्रकल्प कार्यालयाच्या लॉगीनवर शिष्यवृत्ती/फ्रिशीप चे अर्ज दिनांक 25 मार्च 2024 चे आत सादर करण्यात यावे.
शिष्यवृत्तीचे परिपुर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहीत व पोर्टल बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील याला हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. महाविद्यालयाने ऑनलाईन परिपुर्ण पात्र असलेलेच अर्ज या कार्यालयाला मंजुरीकरिता ऑनलाईन सादर करणे तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्रिशीप अर्ज भरणेकरिता आदित्य जीवने, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली यांनी महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.