कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

भंडारा, दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात शेती असणाऱ्या इच्छूक शेतकऱ्यांनी या विभागास शेती विकण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा या कार्यालयास विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.