खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा आयोजन

नाचणभट्टी आदर्श गाव येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा आयोजन कृषी विज्ञान केंद्र,सिंदेवाही-

 

दिनांक 14/06/ २०२३ रोजी कृषी विज्ञान केंद्र,सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही कृषी विभाग , चंद्रपूर ,प्रकल्प संचालक आत्मा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा’ आदर्श गाव नाचणभट्टी ता.सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मच्छिंद्र दिघू रामटेके, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच होते. उद्घाटक म्हणून सौ. विद्याताई खोब्रागडे, सरपंच, नाचणभट्टी होते. मा.श्री.एस.एम.तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर, कु.प्रीती हिरलकर प्रकल्प संचालक आत्मा, चंद्रपूर, कु.अर्चना फुलसुंदर, उपविभागीय कृषी अधिकारी,नागभीड, डॉ.जी.आर. शामकुवर, प्राध्यापक, वि.क्रू.सं.कें, सिंदेवाही आणि श्री. पुष्पक बोथीकर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,गडचिरोली, तसेच श्री. चेतन डी.डाहे,तालुका समन्वयक, टाटा ट्रस्ट, चंद्रपूर, श्री. के.एल.जाधव,ए.आर.एम.,जी.एस.पी.क्रॉ.सा.प्रा.ली.,अहमदाबाद होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये डॉ.व्ही.जी. नागदेवते, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र,सिंदेवाही यांनी खरीप हंगामातील धान पिकाचे लागवड तंत्रज्ञान,एकात्मिक पिक पद्धतीचे तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी स्वतःचा आर्थिक विकास करावा असे आवाहन केले. प्राध्यापक डॉ.जी.आर. शामकुवर, यांनी विद्यापीठ विकसित धान पिकाच्या विविध वानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. पुष्पक बोथीकर यांनी खरीप पिकाच्या कीड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. कु.प्रीती हिरलकर, यांनी आत्मा कार्यालया तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी खरीप पूर्व शेतकरी मेळावा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले ,व नंतर मा.श्री.एस.एम.तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,चंद्रपूर यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांची आदर्श गाव ही संकल्पना अतिशय छान असल्याचे अधोरेखित केले व शेतकऱ्यांना पूर्व मशागती पासून काढणी पर्यंत सर्व तंत्रज्ञान अवगत करावे असे संबोधित केले व युक्तीला मेहनतीची जोड देऊन आर्थिक विकास करावा असे सांगितले.

कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही शास्त्रज्ञ् व इतर मान्यवारांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सर्व नागरिकांनी अवलंब करावा असे सौ.खोब्रागडे सरपंच नाचणभट्टी यांनी केले. डॉ.एस.एन. लोखंडे यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, डॉ. वर्षा जगदाळे यांनी कुक्कुटपालन व शेळीपालन डॉ.व्ही.एन.सिडम यांनी कृषी क्षेत्रात प्रसार माध्यमांचे महत्व विषद केले व शेवटी डॉ.व्ही.एन.सिडम यांनी सर्वांचे आभार माणून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे घोषित केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला कृषी विज्ञान केंद्र,सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही कृषी विभाग , चंद्रपूर ,प्रकल्प संचालक आत्मा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा आदर्श गाव नाचणभट्टी ता.सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आलेले होते

सर्वप्रथम मा.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस मल्यापार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले ,त्या नंतर कृषी विज्ञान केंद्र ,सिंदेवाही यांच्या तर्फे मान्यवारांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी एकात्मिक पिक पद्धती चे स्वीकार करून शेतकऱ्यांनी स्वतःचा आर्थिक विकास करावा असे मार्गदर्शन केले ,त्यांनतर वि. क्रू.सं. कें, सिंदेवाही चे प्राध्यापक डॉ.श्यामकुवार यांनी विद्यापीठ विकसित धान जातींचा उपयोग करून आर्थिक उन्नती कशी करता येईल या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण पिकशास्त्र्ज्ञ् डॉ.बोथीकर यांनी खरीप हंगाम पूर्व पिकाच्या रोगांचे एकात्मिक रोग नियंत्रण या बाबतीत मौल्यवान मार्गदर्शन केले. कु.प्रीती हिरलकर यांनी आत्मा कार्यालया तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी माहिती सांगितली व कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांनी खरीप पूर्व शेतकरी मेळावा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. मा.श्री.एस.एम.तोटावार, यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ.शरद गडाख यांची ‘आदर्श गाव’ ही संकल्पना चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे हे अतिशय छान असल्याचे अधोरेखित केले व शेतकऱ्यांना पूर्व मशागती पासून काढणी पर्यंत सर्व तंत्रज्ञान अवगत करावे असे संबोधित केले व युक्तीला मेहनतीची जोड देऊन आर्थिक विकास करावा असे सखोल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ् व इतर मान्यवारांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सर्व नागरिकांनी अवलंब करावा असे सौ. विद्याताई खोब्रागडे यांनी आवाहन केले. डॉ.एस.एन. लोखंडे यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, डॉ.वर्षा जगदाळे यांनी कुक्कुटपालन व शेळीपालन आणि डॉ.व्ही.एन.सिडाम यांनी कृषी क्षेत्रात प्रसार माध्यमांचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले. श्री.चेतन डाहे,श्री.के.एल.जाधव आणि श्री सतीश सामृतवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.एन. लोखंडे व आभार प्रदर्शन डॉ.व्ही.एन. सिडाम यांनी केले.