मुख्यमंत्री महोदयांनी घेतली निवेदनाची दखल

मुख्यमंत्री महोदयांनी घेतली निवेदनाची दखल

          भंडारा दि.20 :आज भंडारा  येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ अशी बातमी काही माध्यमांनी प्रसारित केली. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे खुलासा सादर करण्यात येत आहे.

त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार कार्यक्रम सुरू असताना आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ झाला हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत स्वतः निवेदनकर्त्याला लेखी निवेदनासहित बोलवून त्याचे म्हणणे ऐकून घेतले, आणि त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

उपरोक्त लेखी निवेदन गोसीखुर्द बाधिताच्या  मागण्यांबाबत आहे.त्या निवेदनाची सकारात्मक दखल  मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे.गोसे खुर्द बाधितांच्या बाबतीतील मुद्द्यांसंबंधीची सविस्तर माहिती घेऊन लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.