आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी 15 जून पर्यंत मुदतवाढ

आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी 15 जून पर्यंत मुदतवाढ

 

भंडारा, दि. 8 : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता 15 जून 2023 पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी.

 

जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी करिता जातांना शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड व बॅंक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रासह नोंदणी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करावी. तसेच ज्या सबएजंट संस्थांचे आय. डी. सुरू आहेत त्या संस्थांनी धान खरेदी सुरू करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, भंडारा तर्फे करण्यात आले आहे.