डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज आमंत्रित

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 8 : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक 30 जून 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.