येत्या गुरूवारी जिल्हा रूग्णालयात महा रक्तदान शिबीराचे आयोजन

येत्या गुरूवारी जिल्हा रूग्णालयात महा रक्तदान शिबीराचे आयोजन

 

भंडारा दि. 7 :रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान म्हटले जाते. रक्तदानाने धोक्यात असलेल्या रूग्णांचे प्राण वाचविण्यात येतात. वाढत्या रक्ताची मागणी लक्षात घेता रक्तदानासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून रक्तदान करावे. यासाठी जिल्हा रूग्णालयात 9 फेब्रुवारी रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच सामान्य नागरिकांना वेळेत व अल्पदरात आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने जिल्हा रूग्णालयात आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात थॅलेसिमीया, थॉयरॉईड, मधूमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग याच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सोबतचा दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेच ई-कार्ड वाटप देखील करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रूग्णांनी या मोफत आरोग्य शिबीरामध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आहे.

9 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, स्त्रि रूग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्रावर देखील रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.