दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा…

दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा

· गाई-म्हशींच्या संगोपनासाठी मिळणार अनुदान

 

भंडारा, दि. 8 : शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनातून नगदी रक्कम मिळते. दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना जोडधंदा मिळतो. मात्र बरेचदा त्यांच्यासाठी लागणाऱ्या वैरण-चाऱ्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडेनासा होतो. त्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बॅकामधून केसीसी टू ॲनिमल हजबंडरी ही योजना राबविण्यात येत आहे.

 

ज्या शेतकऱ्यांकडे दुग्ध पालनासाठी स्वतःच्या मालकीचे गाई म्हशी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पीक विमाच्या धर्तीवर ही योजना आहे. यामध्ये प्रती गाय बारा हजार रुपये तसेच प्रती म्हैस 17 हजार रुपये प्रमाणे कर्ज पात्र लाभार्थ्याना वितरीत करण्यात येते. त्याचप्रमाणे मत्स्यपालकांसाठीही या योजनेत साडेसात हजार रूपयांपर्यत सदस्यत्व आवश्यक आहे. आणि सोसायटीचा स्वतःचा तलाव असणे आवश्यक आहे. वरील दोन्ही योजनामध्ये व्याजाचा दर हा 7% राहील आणि परतफेडीचा अवधी एक वर्ष राहील. जे शेतकरी एक वर्षाच्या आधी कर्ज भरतील त्यांना तीन टक्के व्याज परतावा मिळेल. ही योजना 31 मार्च 2024 पर्यंत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक गणेश तईकर यांनी केले आहे. काल (दि.7) जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व महामंडळे व बॅंकाची सविस्तर बैठक घेतली. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना योजनेचे लाभ वेळेत देण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी ‍बॅक ऑफ इंडीयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.