आरसेटी संस्थेद्वारा निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

आरसेटी संस्थेद्वारा निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

         भंडारा, दि. 26 : महाराष्ट्र  शासन व बॅक ऑफ इंडिया प्रायेाजित स्टार स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी संस्थेद्वारा) निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ऑगस्टपासून ३० दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे.या प्रशिक्षणामध्ये पोट्रेट DSLR कॅमेरा फोटो शुटींग,फोटो स्टुडिओचे वव्यवस्थापन,फ्लॅश फोटोग्राफी,विडीओ एडिटींग ॲन्ड ऑडियो डबिंग,इवेन्ट शुटींग कलर बॅलेन्स एक्सपोजर व न्युज फोटोग्राफी, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायची संधी, बाजार सर्वेक्षण ,बँकेच्या योजना या बद्दल मार्गदर्शन  दिले जाईल. तसेच प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला,गुणपत्रिका,रेशनकार्ड,आधार कार्ड,मनरेगा कार्ड,सोबत आणणे आवश्यक आहे

         सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, रहाणे इत्यादीचा सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगारांची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय 18 ते 45 वयोगटातील तसेच शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष व महिलांनी मुलाखतीकरिता  1 ऑगस्ट 2023 ला सकाळी दहा वाजता बि.ओ.आई.स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी इमारत, लालबहादूर शास्त्री मनरो शाळेच्या मागे शास्त्री चौक, बाजुला कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे,असे आवाहन बि.ओ.आई आरसेटी कार्यालयानी कळविले आहे.

                                        0000000

जिल्हा सैनिक कार्यालयात कारगील विजय दिवस साजरा

भंडारा,26 : जिल्हा सैनिक कार्यालयात कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शगजेंद्र बालपांडे, उपविभागीय अधिकारी होते तसेच आकाश अवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,भंडारा हे ही उपस्थित होते. तसेच जिल्हयातील माजी सैनिक श्री. दिवाण निर्वाण, श्री. सखाराम वाठई, श्री. विनोद बांते,  श्री. छगनलाल गायधने,  श्री. रामकृष्ण तीतीरमारे, श्री. महेश भुरे व बरेच माजी सैनिक तसेच शासकीय कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाध्ये श्री. दिवान निर्वाण, माजी सैनिक यांनी कारगील दिवसाबाबत उपस्थितांना माहिती दिली.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा श्री. आकाश अवतारे यांनी मानोगत व्यक्त करतांनी सांगीतले की,  जुलै 1999 मध्ये काश्मीर कारगील येथे झालेल्या लढाईतील वीरांच्या कामगिरीचे थोडक्यात वर्णन केले.

सैनिक देशातील जनतेच्या प्राणांचे रक्षण करतात. वीरमाता व विरपत्नी यांच्या घरातील सदस्यांनी देशासाठी सर्वाच्च बलिदान दिले आहे त्यांना जिवनात अनेक समस्यांना तोंड दयावे लागते त्यामुळे त्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात.समाज म्हणून आपली नैतीक जबाबदारी आहे. त्यांच्या जिल्हापातळीवरील किंवा राज्य अथवा केंद्रशासन पातळीवरील कामे तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील व त्यांच्या समस्या वर कार्यवाही होईल अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  सुधाकर लुटे, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कार्यालयातील कर्मचारी  सुरेश घनमारे (कल्याण संघटक),  विनोद लांजेवार यांचे अभिनंदन केले.