शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

ओबीसी महामंडळाशी संपर्क साधावा

 

भंडारा, दि. 8 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात असून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी परदेशात उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन इत्यादी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत संपूर्ण कर्ज संबंधित बँकेचे राहणार आहे. विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल 12 टक्के पर्यतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. अर्ज भरतांना संकेतस्थळावर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना हा पर्यायाची निवड करुन कर्ज मागणी अर्ज भरावा. अर्जासोबत मूळ कागदपत्रे अपलोड करावीत.

 

यामध्ये देशातंर्गत अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञान, अभियांत्रीकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान तर परदेशी अभ्यासक्रमात आरोग्य विज्ञान, अंभीयात्रीकी, व्यावसायीक व व्यवस्थापन, विज्ञान, कला बॅंकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, या इमारतीतील कार्यालयात तसेच 9665278074, 9552315088, 9158188739 संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिल अस्वार यांनी केले आहे.