विशेष लेख/गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

विशेष लेख/गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 

शेती आणी शेतकरी हाच कायम शासनाचा कायम केंद्रबिदु राहीलेला आहे. केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यातील सरकार जनतेच्या कल्याणासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवितात. या योजनांच्या माध्यमातून सरकार राज्यातील जनतेला विविध आरोग्य सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना व राज्यातील वृध्द नागरिकांसाठी पेन्शन योजना, त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक प्रकारच्या सुविधा आणि योजना तयार करतात. या योजनांची अंमलबजावणी अशा रीतीने केली जाते कि या योजनांचा लाभ तळागाळातील म्हणजेच राज्यातील सर्वात गरीब शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यात येतो. शेती व्यवसाय करतांना शेतकऱ्यांबरोबर अनेक प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते कारण शेतामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात, पावसाळ्यामध्ये त्यांना विजेची भीती असते. सध्या हवामान खात्याच्या दामीनी ॲप व्दारा स्मार्ट फोनव्दारे शेतकऱ्यांना माहिती वेळोवेळी देण्यात येत आहे.

 

शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या अनेक प्रकारच्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेच्या अंतर्गत विमाछत्र प्रदान करण्यात आले असून, या योजनेच्या अंतर्गत विम्याचा लाभ शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना देण्यात येतो. या योजनेंतर्गत, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य, आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी, 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

वीज, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धोका, रस्ते अपघात, वाहन अपघात यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, तसेच शेती व्यवसायादरम्यान इतर कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काही शेतकरी अपंगत्वास कारणीभूत ठरतात. अपघात ज्यामुळे कुटुंबाचा कमावणारा माणूस मारला जातो. अशा शेतकरी कुटुंबाला अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर वाईट आर्थिक परिस्थिती निर्माण होऊन त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अशाप्रकारच्या परिस्थतीत मदतीचा भक्कम आधार मिळावा या महत्वपूर्ण उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते, त्यामुळे शेतकरी, स्वतःचा विमा काढू शकता नाही. तसेच शेती हा व्यवसाय करतांना त्यांना अनेक प्रकारच्या अपघातांना समोर जावे लागते आणि अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या योजनेंतर्गत, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य, आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी, 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

या योजनेंतर्गत खाली दिलेल्या विविध कारणांमुळे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते आणि अपघाताच्या प्रकारानुसार विम्याची रक्कम मंजूर केली जाते.

 

· वीज पडून मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचू डंक, वाहन अपघात, रस्ता अपघात, विजेचा धक्का लागून मृत्यू, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे किंवा इतर कारणांमुळे विषबाधा, हत्या, उंचीवरून पडणे अपघात, नक्षलवाद्यांनी मारले, क्रूर प्राण्यांच्या चाव्यामुळे मृत्यू किंवा जखम, दंगा.

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत, शेतकरी खालील कारणांमुळे लाभ घेऊ शकत नाही.

 

· नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी अगोदरचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या, जाणूनबुजून स्वतःला इजा करणे, गुन्हा करण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करत असताना झालेला अपघात, ड्रग्ज सेवनामुळे अपघात, भ्रम, बाळंतपणात मृत्यू, अंतर्गत रक्तस्त्राव, मोटर रेसिंग अपघात, युद्ध, जवळच्या लाभार्थी / वारसांकडून हत्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी अधिक्षक कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.